पुणे, 20 एप्रिल 2023: अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, पीएमडीटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात आरोही देशमुख हिने, मुलांच्या गटात स्मित उंद्रे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
पाषाण रोड येथील सीपीआर व एनसीएल टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात सातव्या मानांकित आरोही देशमुख हिने अव्वल मानांकित सानवी मिश्राचा 6-2, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. जान्हवी चौगुलेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या श्रावी देवरेचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-5, 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित स्वानिका रॉयने आठव्या मानांकित शिबानी गुप्तेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित रीशिता पाटीलने पाचव्या मानांकित साझी जैनचे 7-6(2), 6-2 असे आव्हान संपुष्टात आणले.
मुलांच्या गटात सातव्या मानांकित स्मित उंद्रेने अव्वल मानांकित सनत कडलेचा 6-3, 7-5 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. नमिश हुड याने स्वर्णिम येवलेकरचा 6-4, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. आठव्या मानांकित सक्षम भन्साळीने ध्रुव सेहगलचा 6-2, 6-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित प्रज्ञेश शेळकेने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जोशुआ डिक्रूझचा 6-2, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात रित्सा कोंडकर व काव्या पांडे या जोडीने दुसऱ्या मानांकित साझी जैन व इरा त्रिपाठी यांचा 6-4, 6-4 असा पराभव केला. आरोही देशमुख व रीशिता पाटील यांनी अवनी देसाई व श्रावणी पांगम यांचा 6-2, 6-1 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: मुली:
आरोही देशमुख(7)वि.वि.सानवी मिश्रा(1)6-2, 6-4;
स्वानिका रॉय(3)वि.वि. शिबानी गुप्ते(8) 6-3, 6-2;
जान्हवी चौगुले वि.वि.श्रावी देवरे 3-6, 7-5, 7-6(5);
रीशिता पाटील(2)वि.वि.साझी जैन(5) 7-6(2), 6-2;
मुले:
स्मित उंद्रे(7)वि.वि. सनत कडले(1)6-3, 7-5;
नमिश हुड वि.वि.स्वर्णिम येवलेकर 6-4, 6-4;
सक्षम भन्साळी(8)वि.वि.ध्रुव सेहगल 6-2, 6-0;
प्रज्ञेश शेळके(2)वि.वि.जोशुआ डिक्रूझ 6-2, 7-5;
दुहेरी: मुली: उपांत्यपूर्व फेरी:
आरोही देशमुख/ रीशिता पाटील(1) वि.वि.अवनी देसाई/श्रावणी पांगम 6-2, 6-1;
अस्मी टिळेकर/सम्रादन दळवी वि.वि.वरा ईश्वर/स्वरा जावळे 6-4, 6-0;
स्वनिका रॉय/ श्रावी देवरे(4) वि.वि.काव्या देशमुख/श्रेया होनकन 6-1, 6-4;
रित्सा कोंडकर/काव्या पांडे वि.वि.साझी जैन/इरा त्रिपाठी(2) 6-4, 6-4;
मुले: दुसरी फेरी:
सनत कडले/सूर्या काकडे(1) वि.वि.अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे 7-5, 6-0;
आरव पटेल/शिवराज जाधव वि.वि.निलय ढवळे/अनुराग पाटील 6-0, 6-2;
त्रिशिक वाकलकर/रोहन बजाज(4)वि.वि.रिशान गुंदेचा/जोशुआ डिक्रूझ 7-5, 7-5;
समिहन देशमुख/वेद मोघे वि.वि.नमिश हुड/स्मित उंद्रे 6-3, 4-6, 10-8;
सक्षम भन्साळी/स्वर्णिम येवलेकर(3) वि.वि.नीरज जोरवेकर/आश्रित माज्जी 6-1, 3-6, 10-5;
प्रद्न्येश शेळके/आर्यन किर्तने वि.वि.साईराज शेवाळे/वीर चतुर 7-5, 6-7(4), 11-9;
प्रद्युम्न ताताचर/वैष्णव रानडे वि.वि.प्रजीत रेड्डी/आरव ईश्वर(2) 7-6(4), 4-6, 10-2.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान