पुणे, 16 मार्च 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत न्यू इंडिया सॉकर क्लब, रियल पुणे युनायटेड एफसी, फातिमा इलेव्हन, रेंजहिल्स यंग बॉईज एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत झेफनिया मिनेझिस 4,6,29 मि.) याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर न्यू इंडिया सॉकर क्लब संघाने दिएगो ज्युनियर एफसी संघाचा 5-1 असा पराभव केला. पराभूत संघाकडून ॲलन बिनॉय (43 मि) याने एक गोल केला.
दुसऱ्या लढतीत यश गटकल(27मि.) याने नोंदवलेल्या एक गोलाच्या जोरावर रियल पुणे युनायटेड एफसी संघाने चेतक एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. अन्य लढतीत फातिमा इलेव्हन संघाने फिनिक्स स्पोर्ट्स अकादमीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघाकडून जस्टिन अर्लंड(2मि.), याझाद आगा(10मि.), आर्यन चौधरी(22मि.), अयान खान(39मि.), अक्षय पाटील(45मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने डेक्कन इलेव्हनचा 5-0 असा सहज पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाकडून निशित हेगडे(3,9,24मि.) याने तीन गोल, तर श्रीतेज इंगळे(23मि.), तनिश दादलानी(50 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
निकाल: साखळी फेरी:
न्यू इंडिया सॉकर क्लब: 5(झेफनिया मिनेझिस 4,6,29 मि., कार्तिक भंडारे 27,39 मि.) वि.वि.दिएगो ज्युनियर एफसी: 1(ॲलन बिनॉय 43 मि.);
रियल पुणे युनायटेड एफसी: 1(यश गटकल 27 मि.)वि.वि.चेतक एफसी: 0:
फातिमा इलेव्हन: 5(जस्टिन अर्लंड 2मि., याझाद आगा 10मि., आर्यन चौधरी 22मि., अयान खान 39मि., अक्षय पाटील 45मि.) वि.वि.फिनिक्स स्पोर्ट्स अकादमीः0;
रेंजहिल्स यंग बॉईज एफसी: 5 (निशित हेगडे 3,9,24 मि., श्रीतेज इंगळे 23 मि., तनिश ददलानी 50 मि.)वि.वि.डेक्कन इलेव्हन: 0.

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत न्यू इंडिया सॉकर क्लब, आयफा, फातिमा इलेव्हन संघांचे विजय
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत द बिग डिंक्स संघाला विजेतेपद
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत बीएम स्मॅशर्स, द बिग डिंक्स संघांचे विजय