पुणे, १३ मार्च २०२६: पुणे महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांना महापालिकेच्या बोधचिन्हासह अधिकृत बॅच (बिल्ला) देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक अमर आवळे यांनी महापालिकेच्या नगरसचिवांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरसचिव योगिता भोसले यांना पत्र दिले आहे.
आवळे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभेतील आणि विधान परिषदेतील सदस्यांना ओळख म्हणून हिरव्या व लाल रंगाचे बॅच देण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना ‘पुणे महानगरपालिका’च्या बोधचिन्हासह ‘सभासद’ असा अधिकृत बॅच देण्यात यावा.
नगरसेवकांना अधिकृत बॅच मिळाल्यास नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्यात सुसंवाद आणि समन्वय साधण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्येही अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.
या संदर्भात आवश्यक प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती आवळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन