सोलापूर, 12 जून, 2023 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या पुरुष व महिला राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत पुरूष गटात पुण्याच्या दुस-या मानांकीत निशित रहाणे याने अमरावतीच्या अव्वल मानांकीत राज बगदाई याचा तर महिला गटात मुंबईच्या कियारा डिसूझाने पुण्याच्या वैष्णवी चौहान पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल टेनिस कोर्ट, सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत पुरूष गटात पुण्याच्या दुस-या मानांकीत
निशित रहाणे याने अमरावतीच्या अव्वल मानांकीत राज बगदाई याला 6-4, 6-0 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. महिलांच्या गटात मुंबईच्या
कियारा डिसूझाने पुण्याच्या वैष्णवी चौहानचा 6-2, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
दुहेरीच्या पुरूष गटात विजेतेपदाच्या लढतीत प्रथमेश शिंदे व कफिल कडवेकर या कोल्हापूरच्या बिगर मानांकीत जोडीने निशित रहाणे व पार्थ चिवटे या पुण्याच्या अव्वल मानांकीत जोडीला 5-7, 6-2(10-8) असा पराभवाचा धक्का देत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. महिला गटात कांचन चौगुले व जोस्त्ना मदने या सोलापूरच्या अव्वल मानांकीत जोडीला मुंबईच्या कियारा डिसूझा व भूमिका त्रिपथ या दुस-या मानांकीत जोडीने पुढे चाल दिली.
स्पर्धेतील एकेरी व दुहेरीच्या विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण तालुका क्रीडाअधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री व स्पर्धा सुपरवायझर वैशाली शेकटकर, स्पर्धा समन्वयक राजीव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-अंतिम फेरी- पुरूष गट
निशित रहाणे(पुणे)(2) वि.वि राज बगदाई (अमरावती)(1) 6-4, 6-0
महिला: एकेरी: अंतिम फेरी
कियारा डिसूझा (मुंबई) वि.वि वैष्णवी चौहान (पुणे) 6-2, 6-1
दुहेरी: अंतिम फेरी: पुरुष
प्रथमेश शिंदे/कफिल कडवेकर(कोल्हापूर) वि.वि निशित रहाणे/पार्थ चिवटे(पुणे)(1) 5-7, 6-2(10-8)
महिला: दुहेरी: अंतिम फेरी
कांचन चौगुले/जोस्त्ना मदने(सोलापूर)(1) पुढेचाल.वि कियारा डिसूझा/भूमिका त्रिपथ(मुंबई)(2)

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय