October 14, 2025

तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात नितीश बेलुरकर आघाडीवर

पुणे, 23 एप्रिल 2025: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात गोव्याच्या नितीश बेलूरकर याने ५ गुणांसह आघाडी प्राप्त केली. तर, ब गटात कर्नाटकच्या बालकिशन ए याने विजेतेपद पटकावले.

अमनोरा हॉल येथील हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत अ गटात गोव्याच्या नितीश बेलूरकर याने पश्चिम बंगालच्या संदिपन चंदाचा पराभव करून 5 गुणांसह आघाडी मिळवली. सामन्यात नितीश याने फ्रेंच ओपन पद्धतीने डावास सुरुवात करत ४३ चालींमध्ये चंदावर विजय मिळवला. दुसऱ्या पटावरील सामन्यात मध्यप्रदेशच्या आयुष शर्माने पीएसपीबीच्या व्यंकटेश एमआर याचा पराभव करून ४.५ गुणांची कमाई केली.

ब (2200 रेटिंग खालील)गटात नवव्या फेरीत दुसऱ्या पटावरील लढतीत कर्नाटकच्या बालकिशन ए याने स्लाव्ह पद्धतीने डावास सुरुवात करत तामिळनाडूच्या राम कृष्णनला 30 चालींमध्ये बरोबरीत रोखले व 7.5 गुण(53.5बुकोल्स कट)सह विजेतेपद पटकावले. तर, पहिल्या पटावरील सामन्यात महाराष्ट्राच्या नमीत चव्हाणने अद्विक अग्रवालचा पराभव केला. पण अद्विक याने 7.5गुण(50 बुकोल्स कट) सह दुसरे स्थान पटकावले. गुजरातच्या अनाडकट कर्तव्य याने महाराष्ट्राच्या श्रीराज भोसलेचा पराभव करून 7.5 गुण(49बुकोल्स कट) सह तिसरे स्थान पटकावले. तत्पूर्वी या फेरीचे उदघाटन अमनोरा मॉलचे संचालक मंगेश तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या बालकिशन ए याला 1,10,000रुपये व करंडक, तर उपविजेत्या अद्विक अग्रवाल याला 95,000/-रुपये व करंडक आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या अनाडकट कर्तव्य याला 85,000/-रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक ओडिशाचे सत्यरंजन पाठक,पंजाबचे मनीष थापर, राजस्थानचे महेश शर्मा, तेलंगणाचे प्रसाद गारु, गुजरातचे भावेश पटेल, ओडिशाचे भट्टाबाबू, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व एमसीएचे सचिव निरंजन गोडबोले, सहसचिव राजेंद्र कोंडे, खजिनदार विलास म्हात्रे, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, हर्निश राजा, चीफ आरबीटर श्रीवत्सन आर आणि राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल:अ गट: पाचवी फेरी:
नितीश बेलूरकर(5गुण, गोवा)वि.वि.संदिपन चंदा(3.5गुण, पश्चिम बंगाल);
व्यंकटेश एमआर(3.5गुण,पीएसपीबी) पराभुत वि.आयुष शर्मा(4.5गुण,मध्यप्रदेश);
सानिकिडझे टॉर्निके(4गुण,जॉर्जिया) बरोबरी वि.मोहम्मद शेख(4गुण,महाराष्ट्र);
दीपन चक्रवर्ती जे(4गुण,आरएसपीबी) बरोबरी वि.अक्षय बोरगावकर(3.5गुण,महाराष्ट्र);
गुयेन व्हॅन हुय(3गुण,व्हिएतनाम) पराभुत वि.पेट्रोस्यान मॅन्युएल(4गुण,अर्मेनिया);
पँटसुलाया लेव्हन(4गुण, जॉर्जिया) वि.वि.पद्मिनी राउत(3गुण,पीएसपीबी);
नीलाश सहा (4गुण, आरएसपीबी) वि.वि.हर्षित साहू(3गुण, ओडिशा);
पोडोलचेन्को एव्हेग्नी(4गुण,बेलारूस)वि.वि.सम्मेद शेटे(3गुण,महाराष्ट्र);
सुयोग वाघ(4गुण,महाराष्ट्र) वि.वि.साचीकाचीखिन मक्सिम(3गुण,फिडे)

ब गट(2200 रेटिंग खालील): नववी फेरी:
नमीत चव्हाण (7.5गुण,महाराष्ट्र)वि.वि.अद्विक अग्रवाल(7.5गुण, महाराष्ट्र);
राम कृष्णन (7गुण,तामिळनाडू)बरोबरी वि.बालकिशन ए(7.5गुण,कर्नाटक);
अनाडकट कर्तव्य(7.5गुण, गुजरात)वि.वि.श्रीराज भोसले(6.5गुण,महाराष्ट्र);
शौर्य पॉल(6.5गुण,पश्चिम बंगाल)बरोबरी वि.शैलेश आर(7गुण,तामिळनाडू);
अधिराज मित्रा(6.5गुण,झारखंड)बरोबरी वि.महिंद्राकर इंद्रजीत(6.5गुण,महाराष्ट्र);
अथर्व मडकर (7गुण,महाराष्ट्र)वि.वि.ज्वालीन मेहता(6गुण, गुजरात);
सिद्धार्थ मोहन(6गुण,केरळ) पराभुत वि.अथर्व सोनी (7गुण,महाराष्ट्र);
कृपा उक्कली(6गुण,कर्नाटक)पराभुत वि. व्योम मल्होत्रा(6.5गुण,हरियाणा);
राम परब (6.5गुण,महाराष्ट्र)वि.वि.स्वैन आशीर्वाद(5.5गुण, ओडिशा);
अद्वैत विभूते(6गुण,कर्नाटक)बरोबरी वि.अर्पण दास (6गुण,पश्चिम बंगाल).