May 15, 2025

एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरिज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे, 23 एप्रिल 2025: हॉटेल रवाईन यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरीज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अमृत वत्स, एम श्रेयंत, राघव सरोदे यांनी तर, मुलींच्या गटात व्रण्डिका राजपूत यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.

पाचगणी येथील हॉटेल रवाईन टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित एम श्रेयंत महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-3, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. पश्चिम बंगालच्या दहाव्या मानांकित अमृत वत्स महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित महिजित प्रधानचा 6-2, 7-6(6) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. राघव सरोदे याने बाराव्या मानांकित आपलाच राज्य सहकारी सार्थक गायकवाडचा 3-6, 6-4, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अकराव्या मानांकित महाराष्ट्राच्या व्रण्डिका राजपूतने पश्चिम बंगालच्या पाचव्या मानांकित रिया रॉयचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सातव्या मानांकित महाराष्ट्राच्या मेहा पाटीलने पश्चिम बंगालच्या नवव्या मानांकित इंद्रक्षी भट्टाचार्यवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला.

निकाल: मुख्य ड्रॉ: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:
वरद पोळ(1)(महाराष्ट्र) वि.वि.शिवराज भोसले(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
अमृत वत्स(10)(पश्चिम बंगाल) वि.वि.महिजित प्रधान(6)(महाराष्ट्र)6-2, 7-6(6);
अथर्व शुक्ला(महाराष्ट्र) वि.वि.आरव पटेल(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
वरद उंद्रे(11)(महाराष्ट्र) वि.वि.अर्जुन मणिकंदन(कर्नाटक) 6-2, 3-6, 7-5;
आराध्य म्हसदे(5)(महाराष्ट्र) वि.वि.शिवतेज शिरफुले(9)(महाराष्ट्र)6-3, 6-0;
नील केळकर(4)(महाराष्ट्र) वि.वि.नीव गोगिया(महाराष्ट्र)6-4, 6-0;
राघव सरोदे(महाराष्ट्र) वि.वि.सार्थक गायकवाड(12)(महाराष्ट्र)3-6, 6-4, 6-3;
एम श्रेयंत वि.वि.सक्षम भन्साळी(2)(महाराष्ट्र) 6-3, 6-3;

मुली:
पार्थसारथी मुंढे(1)(महाराष्ट्र) वि.वि.मायरा टोपनो(महाराष्ट्र) 6-2, 6-0;
मेहा पाटील(7)(महाराष्ट्र) वि.वि.इंद्रक्षी भट्टाचार्य(9)(पश्चिम बंगाल)6-2, 6-4;
शिबानी गुप्ते(3)(महाराष्ट्र) वि.वि.वीरा हरपुडे(महाराष्ट्र)6-3, 6-1;
रिशीता पाटील(6)(महाराष्ट्र) वि.वि.रितिका डावलकर(महाराष्ट्र)6-4, 6-1;
व्रण्डिका राजपूत(11)(महाराष्ट्र) वि.वि.रिया रॉय(5)(पश्चिम बंगाल)6-3, 6-2;
श्रावी देवरे(महाराष्ट्र) वि.वि.रिशीता यादव (महाराष्ट्र) 6-1, 6-0;
स्वानिका रॉय(महाराष्ट्र) वि.वि.जान्हवी तमिनीडी(आंध्रप्रदेश) 2-6, 6-1, 6-1.