मुंबई, 22 फेब्रुवारी 2023: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमबीए/एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफीचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील सर्व सोसायट्यांचा वीजपुरवठा पूर्ववत
‘नृत्यसाधकांनी पूरक विज्ञानमितीही शोधाव्यात’, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे आवाहन