पिंपरी, २१/०३/२०२३: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निविदा विभागातील लिपिक यास एक लाख पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करून, एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून मंगळवारी रंगेहाथ अटक केली आहे.
दिलीप भाऊसिंग आडे (वय – 51 वर्ष ,रा. पिंपरी, पुणे )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे 34 वर्षीय इसमाने तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे देखभाल दुरुस्तीचे काम करतात. त्यांना शासकीय निवेदनुसार काम मिळाले होते. सदर कामाच्या वर्क ऑर्डरची फाईल तयार करून संबंधित विभागाकडे पाठवण्यासाठीचा मोबदला म्हणून निविदा विभागातले लिपिक दिलीप आडे यांनी एक लाख 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र, याबाबत तक्रारदार यांना लाच द्यावयाची नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता, लिपिक दिलीप आढे हा एक लाख पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडी आणती एक लाख रुपये रक्कम स्वीकारत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात पुढील तपास एसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन