December 13, 2024

पीएमपी चालकाला दगडाने मारहाण करीत केले रक्तबंबाळ; भाजपच्या माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

पुणे, १५ मार्च २०२३ : स्वारगेट डेपोतील पीएमपी चालक शशांक देशमाने यांना अभिनव कॉलेज चौकात गंभीर मारहाण करण्यात आली. बुधवारी सकाळी पीएमपी बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात किरकोळ वादविवाद झाले. त्या वादातून चालक देशमाने यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करण्यात आले.

कार चालक हे भाजपचे कार्यकर्ते असून गाडीमध्ये माजी नगरसेविका बसलेल्या होत्या. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. चालक देशमाने यांच्यावर ससून हॉस्पिटल येथे प्रथमपोचार चालू आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.