पुणे, 15 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी बॉम्बर्स संघाने ओडीएमटी नटराजियन्स संघाचा 22-19 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गट 2 मध्ये पीवायसी बॉम्बर्स संघाने ओडीएमटी नटराजियन्सचा 22-19 असा पराभव केला. 100 अधिक गटात पीवायसी बॉम्बर्सच्या शिरीष साठे व धनंजय धुमाळ या जोडीने ओडीएमटी नटराजियन्सच्या वसंत साठे व ऋषिकेश अधिकारी यांचा 6-3 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. 90 अधिक गटात पीवायसी बॉम्बर्सच्या तन्मय आगाशेने सौरभ चिंचणकरच्या साथीत ओडीएमटीच्या उमेश दळवी व निनाद देशमुख या जोडीचा 6-5 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसीच्या नेहा ताम्हाणे व आकाश सुपेकर या जोडीला ओडीएमटीच्या तेजस पोळ व हर्षवर्धन खुर्द यांनी 4-6 असे पराभूत करून हि आघाडी कमी केली. अखेरच्या खुल्या गटाच्या लढतीत पीवायसीच्या पराग टेपन व शिरीष साठे यांनी ओडीएमटीच्या अमर बिडकर व किरण तावरे यांचा 6-5 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट 2: पीवायसी बॉम्बर्स वि.वि.ओडीएमटी नटराजियन्स 22-19(100 अधिक गट: शिरीष साठे/धनंजय धुमाळ वि.वि.वसंत साठे/ऋषिकेश अधिकारी 6-3; 90 अधिक गट: तन्मय आगाशे/सौरभ चिंचणकर वि.वि.उमेश दळवी/निनाद देशमुख 6-5; खुला गट: नेहा ताम्हाणे/आकाश सुपेकर पराभुत वि.तेजस पोळ/हर्षवर्धन खुर्द 4-6; खुला गट: पराग टेपन/शिरीष साठे वि.वि.अमर बिडकर/किरण तावरे 6-5).
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन