January 16, 2026

पुणे: ओैंधमध्ये उद्योजकाच्या बंगल्यातून ३८ लाखांचा ऐवज चोरीस

पुणे, १९/०८/२०२३: ओैंध भागातील एका उद्योजकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ३८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

याबाबत एका उद्योजकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा खतनिर्मिती उद्योग आहे. सांगली भागात त्यांच्या कंपनीचे गोदाम आहे. उद्योजकाचा मुलगा सध्या व्यवसाय सांभाळतो. ओैंधमधील स्पायसर स्कूलजवळ त्यांचा बंगला आहे. उद्योजकाच्या बंगल्यात चोरटे शिरले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातून २७ लाख ५० हजारांचे दागिने आणि ११ लाख रुपयांची रोकड असा ३८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.