December 14, 2024

पुणे: व्यावसायिकाची 83 लाखांची फसवणूक

पुणे, ०४/०५/२०२३: केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध विभागात ओळखी असून शासनाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष वेगवेगळ्या व्यावसायिकांना दाखवले. त्यानंतर पुण्यातील बिबबेवाडी परिसरातील एका व्यवसायिकाची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी हेमंत खिवांसरा( राहणार -मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे )याच्यासह इतर आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आरोपी विरोधात राजेश कृष्णाथ एकबोटे (राहणार – बिबवेवडी, पुणे) यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2018 पासून आतापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत खीवंसरा याने तक्रारदार राजेश एकबोटे यांना विविध प्रकारच्या व्यवसायांच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवले.

तक्रारदारासह इतर काही व्यवसायिकांचा त्यांनी विश्वास संपादन करून आपापसात संगणमत करून व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून तक्रारदार यांच्यासह इतर काही व्यवसायिकांकडून रकमा घेऊन, त्या परत न करता तक्रारदार यांची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पुढील तपास करत आहेत.