October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: हिटर गरम करून पत्नीला दिले चटके, पत्नीच्या तोंडावर केली लघवी

पुणे, ०४/०५/२०२३: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातील कोंडवा परिसरात उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेडरूम मध्ये नेऊन नग्न करत हिटर गरम करून तिच्या शरीरावर गोपनीय ठिकाणी चटके दिले. त्यानंतर पत्नीच्या सदर भाजलेल्या जागेतील अवस्थेतही तिच्याशी क्रुरतेने शारीरिक संबंध केले. त्यानंतर पत्नीच्या लघवीच्या जागेत दगडी बत्ता घालण्याचा प्रयत्न करून पत्नीच्या तोंडावर लघवी केल्याचे घाणेरडे कृत्य केल्याचा खळबजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

याबाबत 35 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांकडे पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलेचा पती असून ३० एप्रिल रोजी संबंधित पीडित महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून, पतीने रागाने ‘ तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना’ म्हणून तिच्या हाताला जोरात ओढून तिला बेडरूम मध्ये घेऊन जाऊन कडी लावली. त्यानंतर महिलेची चार मुले बाहेरून ओरडत असतानाही, आरोपीने दरवाजा न उघडता महिलेस बेडवर पाडून तिला नग्न केले.

त्यानंतर तिच्या कुर्ता व सलवार ,ओढणीने तिला बेडला हातपाय बांधून ठेवत हिटर गरम करून तिच्या लघवी व शौचाच्या जागेवर आरोपीने चटके दिले. त्यानंतर स्वतः नग्न होऊन लघवी व शौचाच्या जागेत भाजलेल्या अवस्थेत क्रुरतेने शारीरिक संबंध केले. त्यानंतर डाबर आवला तेलाची वीस रुपयांची बाटली चार ते पाच वेळा शौचाच्या जागेत घालून बाहेर काढून, दगडी बत्ता घेऊन तो लघवीच्या जागेत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आत गेला नाही त्यामुळे आरोपीने स्वतःच्या दोन्ही पायाच्या अंगठ्याने लघवीच्या जागेत आत -बाहेर करून तिच्या तोंडात त्याचा पाय घातला. त्यानंतर पत्नीच्या तोंडावर लघवी करून ‘ तुला खूप माज आला आहे, तुझा माज उतरवतो ‘म्हणून शिवीगाळ केली. तसेच तिच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण करून मुलांचा जास्त आरडाओरड झाल्यानंतर स्वतः कपडे घालून तसेच पत्नीस कपडे घालण्यास सांगून बेडरूमच्या दरवाजा उघडला. त्यावेळी चार मुले पळत आईकडे आली असताना, तिची अवस्था पाहून ते रडू लागले. त्यावेळी ‘ही मुले देखील माझे आहेत की नाहीत’ असे म्हणून पत्नी सोबत मुली बरोबर देखील सेक्स करू आणि त्यांची काय हालत करतो असे म्हणाला.

त्यामुळे १६ वर्षाची व ११ वर्षाच्या दोन मुली शरमेने मान खाली घालून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच, कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस भाबड पुढील तपास करत आहे.