June 14, 2024

पुणे: भवानी पेठेतील जुगार अड्यावर छापेमारी..!

पुणे, २१/०४/२०२३: भवानी पेठेत सुरू असणाऱ्या जुगार अड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली. छापा कारवाईत पोलिसांनी ९ जणांवर कारवाईकरत १३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

. शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पण, काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसत आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला भवानी पेठेत काहीजन जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, वरिष्ट निरीक्षक भरत जाधव व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. त्यावेळी ९ जणांना पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.