September 10, 2024

पुणे: वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे, २८/०३/२०२३: भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास केशव पाटोळे (वय ६५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कैलास पाटोळे (वय ५८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रामदास पाटोळे सायकलवरुन घोरपडी गाव परिसरातील व्हिक्टोरिया रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने सायकलस्वार पाटोळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खरवडे तपास करत आहेत.