July 24, 2024

पुणे: उसने दिलेले पाच लाख रुपये परत न केल्याने महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, १२/०४/२०२३: पुण्यातील वडारवाडी परिसरात राहणाऱ्या  महिलेने ओळखीच्या एका व्यक्तीस कामाकरिता वेळोवेळी पाच लाख रुपये हात उसने दिले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने पैसे परत न केल्याने महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
 सुरेखा रामदास मते (वय -52 ,रा. वडारवाडी ,पुणे) असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे .याप्रकरणी आरोपी अनिल तुकाराम लोखंडे (रा. बिबेवाडी, पुणे )याच्यावर चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी विरोधात साक्षी रामदास मते (वय- 19) हिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  प्रकार 16.2.2023 रोजी घडला आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,साक्षी मते यांची आई सुरेखा मते यांनी त्यांच्या ओळखीचा आरोपी अनिल लोखंडे यास वेळोवेळी पाच लाख रुपये हात उसने म्हणून दिले होते. ते पैसे वेळोवेळी मागितले असता, आरोपीने ते त्यांना परत केले नाही. तसेच पैसे परत मागितल्यास पोलिसांकडे खोटी तक्रार करीन आणि त्यात अडकवेल अशी धमकी दिल्याने आरोपीच्या त्रासाला कंटाळून सुरेखा मते यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहे.