May 5, 2024

पुणे: चोरी करताना पाहिल्याने महिलेचा खून, कारागृहातून बाहेर आलेल्याला दोन दिवसात अटक

पुणे, २८/०४/२०२३: हडपसर येथील मांजरी बुद्रुक येथे महिलेचा धारदार हत्यारांनी खून करून मृतदहे विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हडपसर पोलिसांनी दोन दिवसात गुन्ह्याचा छडा लावत एकाला अटक केली आहे. त्याने हा खुन महिलेनी चोरी करताना पाहिल्यामुळे व आपल्या कारागृहा जावे लागेल या भितीने केल्याचा प्रकार या निमित्ताने पोलिसांनी उघड केला आहे.

राजेश अशोक मुळेकर (रा. कवडीपाठ, माळवाडी, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

उषा अशोक देशमुख (50, रा. माळवाडी, कवडीपाठ, लोणी काळभोर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्नेहल अभय काळभोर (50, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि. 24 एप्रिल रोजी शेतावर काम करणार्या हत्यारांनी खून करून नंतर मृतदेह फरफटत नेवुन मांजरी बुद्रुक येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्म येथील विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञातावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेज अन्य कोणताही उपयुक्त पुरावा नव्हता. घटनास्थळ ग्रामीण भागातील असलने हडपसर तपास पथक दोन दिवस गरूड वस्ती, झगडे वस्ती, कदमवाक वस्ती, कवडी माळवाहवाडी, कवडीपाट, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी भागात फिरून आरोपी विषयी माहिती घेत होते. कवडी माळवाडी मधील एका व्यक्ती घटना झाल्यापासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच चार ते पाच दिवसापूर्वीच तो कारागृहातून सुटल्याचे समजले. अमंलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांना आरोपी विषयी माहिती मिळाली. संशयीत आरोपी हा फुरसुंगी भागात एका बिहारी व्यक्तीकडे पेंटींगचे काम करण्यासाठी गेल्याचे समजले. त्यानंतर राजेश मुळेकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.

त्याने सांगितले, 24 एप्रिल रोजी दुपारी तो संबंधीत ठिकाणी विहरीवरील पाण्याची मोटर चोरी करण्यासाइी गेला होता. मोटार चोरत असताना उषा देशमुख यांनी त्याला पाहिले. तसेच त्यांनी तुझ्याबाबत येथील अधिकार्‍यांना सांगते म्हणून त्या निघून जात असताना आपले नाव सगळ्यांना समजेल व पुन्हा कारागृहात जावे लागेल या विचाराने राजेशने सिमेंटची विट महिलेच्या डोक्यात घातली नंतर कोयत्याने वार करत तिचा खून केला. नंतर तिला फरफरट विहरीत टाकले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजरकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, शाहीद शेख, सचिन जाधव, प्रशांत टोनपे यांच्या पथकाने केली.