May 20, 2024

पुणे: दुचाकीला धक्का लागल्याची बतावणी करीत तरुणाला लुटले

पुणे, दि २१/०३/२०२३: दुचाकीला धक्का लागल्याची बतावणी करीत त्रिकुटाने तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्याकडील तीन हजारांची रोकड आणि मोबाइल हिसकावून नेला. ही घटना १९ मार्चला रात्री दहाच्या सुमारास बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरात घडली.

याप्रकरणी किसन जेसवाल (वय १९ रा. पाषाण) याने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन पाषाणमध्ये राहायला असून १९ मार्चला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुचाकीवरुन घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघाजणांनी किसनला दुचाकीचा धक्का लागल्याची बतावणी करीत शिवीगाळ केली. त्यानंतर टोळक्याने किसनच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीररित्या जखमी केले. त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड आणि १५ हजारांचा मोबाइल चोरुन नेला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.