पुणे, २७/०८/२०२३: विमाननगरमधील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक सत्तुजी टिक्कल (वय २८, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पीडीत तरुणीला टिक्कलने विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले होते त्यावेळी त्याने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तिला त्रास झाल्याने टिक्कल याने तिला जवळ असलेल्या एका हाॅटेलमध्ये नेले.
तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही