पुणे, ०५/०८/२०२३: गणेशखिंड रस्त्यावर दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोतील दूध रस्त्यावर सांडल्याने रस्ता निसरडा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन रस्ता धुवून काढला.
गणेशखिंड रस्त्यावरील राहुल चित्रपटगृहासमोर असलेल्या उड्डाणपुलाच्या कठड्याला टेम्पो आदळला. टेम्पो आदळल्याने चालक जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पोतून दूध वाहतूक करण्यात येत होती. कॅनमधील शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडले. दूध सांडल्याने रस्ता निसरडा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन रस्ता धुवून काढला.
टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळला. दूधात ऑइल मिसळल्याने रस्ता निसरडा झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही