पुणे, ९/०७/२०२३: शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याने जाब विचारणाऱ्या आईला भररस्त्यात मारहाण करुन पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपी अमळनेरमध्ये पसार झाला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेतले.
प्रतीक उर्फ लक्या सतीश पाटील (वय १९ रा. त्रिमूर्ती विहार, भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. पाटील याच्याविरुद्ध विनयभंग, तसेच बाललैंगिक अत्यचाार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हडपसर भागात तक्रारदार महिला भाजी विक्री करते. महिलेची चौदा वर्षांची मुलगी एका शाळेती आहे. मुलगी आईला भाजी विक्री व्यवसायात मदत करते. आराेपी पाटीलने भाजी विक्री करणाऱ्या मुलीचा विनयभंग केला होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला जाब विचारला. तेव्हा आरोपीने आईला भररस्त्यात मारहाण केली आणि तो पसार झाला.
घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रताप शेळके, हवालदार रामेश्वर नवले, समीर पांडुळे यांनी पसार झालेला आरोपी पाटील याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाटील अमळनेरमध्ये पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.