May 15, 2024

पुणे: बाणेर भागातील नदीपात्रातील अतिक्रमणावर कारवाई

पुणे, २३ मे २०२३ : पुणे महापालिकेने होऊन जाते बाणेर या आठ किलोमीटरच्या अंतरात निधी घाट सुधार प्रकल्प राबवण्यासाठी विविध प्रक्रिया सुरू केलेली असताना त्यामध्ये अर्थशास्त्र असे अतिक्रमण आज महापालिकेने काढून टाकले जवळपास 67 हजार चौरस पोटाच्या अनेक महापालिकेच्या बांधकाम विभागाने जोरदार कारवाई केली.

बाणेर येथील बाणेर – औंध लिंक रास्ता ( मेडि पॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक ) व मुळा नदीचे निळया पूर रेषेतील येथे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई केली. बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई नियोजित करण्यात आली होती. या ठिकाणी यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. पण पुन्हा नागरिकांनी निळया पूर रेषे बांधकामे केली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे.

या कारवाई मध्ये सुमारे ६७,०००चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडले.
या कारवाईमध्ये पुणे महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, सह महापालिका आयुक्त खलाटे, बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली, उप अभियंता निवृत्ती उतळे,
कनिष्ठ अभियंता संदेश कुवळमोडे, अजित सणस, विश्वनाथ बोटे, डी. एन. जगताप, आरेखक नविन महेत्रे, टूलीप इंजिनियर सुरज शिंदे, प्राची सर्वगोड
दोन अतिक्रमण निरक्षक, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, एक अग्निशमन व्हॅन, एक क्रेन, १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.