पुणे, दि. २६/०५/२०२३: ऑनलाईन फूड डिलीव्हरी अपव्दारे एलएसडी स्टॅमची तस्करी करणार्या उच्चशिक्षिताकडून आणखी १ हजार २५० नशेली एलएसडी जप्त केल आहेत. बाजारपेठेत त्याची किंमत ६२ लाख ७० हजार रुपये आहे. आतापर्यंत पाचही आरोपींकडून तब्बल १ कोटी १६ लाख ३२ हजारांवर अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील काही दिवसांतील अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली ही सर्वात मोठी स्टॅमची कारवाई असल्याचे उघडकीस आले आहे.
रोहन दिपक गवई वय २४ रा. डिपी रोड, कर्वे पुतळा, सुशांत काशिनाथ गायकवाड वय २६ रा. संभाजीनगर, कोडोली सातारा सध्या बाणेर, धिरज दिपक लालवाणी वय २४ रा. पिंपळे-सौदागर, दिपक लक्ष्मण गेहलोत वय २५ आनंदनगर आणि ओंकार रमेश पाटील, वय २५ रा. पाटील साई व्हिला,वाकड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .
अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केलेल्या आरोपींपैकी ओंकार पाटीलकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने दुचाकीच्या डिक्कीत एलएसडी स्टॅम ठेवल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या सूचनेनुसार पथकाने धाव घेत दुचाकीच्या डिक्कीतून ६२ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १ हजार २५० स्टॅम्प जप्त केले.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन