कोल्हापूर, 26 मे 2023 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने व डीवाय पाटील पुरस्कृत 18व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या समर्थ सहिता व अर्णव पापरकर यांच्या विजेतेपदाची लढत रंगणार आहे. मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी व तेलंगणाच्या ऋषिता बसिरेड्डी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरी मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत अर्णव पापरकरने आपल्या खेळात सातत्य राखले व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कार्नाटकच्या दुस-या मानांकीत आराध्या क्षितिजचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत समर्थ सहिताने दिल्लीच्या प्रणील शर्मा याचा 6-4, 6-0 असा एकतर्फी लढतीत पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात एकेरीत कर्नाटकच्या बिगर मानांकीत साई जान्वी टी हीने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकीत नैनिका रेड्डी बेंद्रमचा 6-3, 6-4 असा तर तेलंगणाच्या नवव्या मानांकीत ऋषिता बसिरेड्डीने महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदेचा 6-1, 7-6(2) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव या अव्वल मानांकीत जेडीने ओडिशाच्या सोहिनी मोहंती व कर्नाटकच्या हरिशिनी एन यांचा 6-4, 6-4 असा तर महाराष्ट्राच्या नानिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुस-या मानांकीत जोडीने कर्नाटकच्या अरझान खोराकीवाला व दिल्लीच्या यशिका शोकीन या तिस-या मानांकीत जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन या कर्नाटकच्या बिगर मानांकीत जोडीने गुजरातच्या कबीर चोठानी व महाराष्ट्राच्या समर्थ साहित्य या अव्वल मानांकीत जोडीला 7-5, 6-2 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या प्रणील शर्मा व हरयाणाच्या आदित्य मोर यांनी तेलंगणाच्या धीरज रेड्डी व्ही व राहुल लोकेश यांचा 6-4, 1-6, 10-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर येथे उद्या दिनांक 27 मे(शनिवार) रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:
समर्थ सहिता(महाराष्ट्र)(4) वि.वि प्रणील शर्मा(दिल्ली) 6-4, 6-0
अर्णव पापरकर(महाराष्ट्र) वि.वि आराध्या क्षितिज(कार्नाटक)(2) 6-3, 6-4
मुली
साई जान्वी टी(कर्नाटक) वि.वि नैनिका रेड्डी बेंद्रम(महाराष्ट्र)(13) 6-3, 6-4
ऋषिता बसिरेड्डी(तेलंगणा)(9) वि.वि प्रिशा शिंदे (महाराष्ट्र) 6-1, 7-6(2)
दुहेरी गट उपांत्य फेरी: मुले:
आराध्या क्षितिज(कर्नाटक)/श्रीनिकेत कन्नन(कर्नाटक) वि.वि कबीर चोठानी(गुजरात)/समर्थ साहित्य(महाराष्ट्र)(1) 7-5, 6-2
प्रणील शर्मा(दिल्ली)/आदित्य मोर(हरयाणा) वि.वि धीरज रेड्डी व्ही(तेलंगणा)/राहुल लोकेश(तेलंगणा) 6-4, 1-6, 10-0
मुली
आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र)/ ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र)(1) वि.वि सोहिनी मोहंती(ओडिशा)/हरिशिनी एन(कर्नाटक)6-4, 6-4
नानिका बेंद्रम(महाराष्ट्र)/सेजल भुतडा(महाराष्ट्र)(2) वि.वि अरझान खोराकीवाला(कर्नाटक)/ यशिका शोकीन(दिल्ली)(3) 6-3, 6-4
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.