May 4, 2024

पुणे: तब्बल १५० घरफोडीचे गुन्हे केलेला अट्टल चोरटा अटकेत, २२ लाख २० हजारांचे दागिने जप्त

पुणे, दि. ०७/०९/२०२३: दिवसा घरफोडी करीत १५० हुन अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २२ लक्ष २० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी, वय ४० रा. थेऊर रोड, गडबे कॉर्नर, लोणी काळभोर असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे घडले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक ( संजय मोगले, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे याचे पथक चोरट्याचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, राहुल रासगे यांनी २०० सीसीटिव्हिची पाहणी करुन आरोपीचा माग काढला. तो थेऊर फाटा येथे राहत असल्याची माहिती प्राप्त केली. पोलीस त्याला घरी पकडण्याकरिता गेले असता आरोपीने घराचा दरवाजा लावुन घेवुन पोलीसांना ४ ते ५ तास झुलवत ठेवले.

मागील दरवाजाने पळुन जाण्याचा प्रयत्न करित होता. परंतु पोलीसांनी त्याच्या घराला चारही बाजुने घेरुन सापळा रचुन शर्तीचे प्रयत्न करुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. आरोपी १५ गुन्हयात फरारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरुध्द यापुर्वी १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असुन मध्यरात्रीच्या सुमारास तो साथीदाराच्यासह गुन्हे करित होता. ओळख पटु नये म्हणुन तोंडाला रुमाल बांधुन व डोक्यावर टोपी घालुन साथीदार सोबत न घेता दिवसा घरफोडी गुन्हे केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केली.