June 24, 2024

पुणे: बब्बाली खान वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबध्द

पुणे, १०/०८/२०२३: समर्थ, कोंढवा तसेच खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत धारदार हत्यारे बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईतावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबध्दतेची कारवाई केली. त्याला एक वर्षासाथी एमपीडए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.

फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान (50, रा. आयना मस्जिद समोर, ए. डी. कॅम्प चौक, भवानी पेठ, पुणे) असे स्थानबध्द करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर पाच वर्षामध्ये 11 गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाल्यामुळे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक राजु बहिरट यांनी याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांपुढे सादर केला होता. त्याला पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली.