June 14, 2024

पुणे: पत्नीवर विवस्त्र अवस्थेत नाचायला पाडले भाग

पुणे, १०/०८/२०२३: मोबाईलमधील पॉर्न व्हिडीओ पत्नीस पाहण्यास सांगून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करत तिला विवस्त्र अवस्थेत नाचायला भाग पाडल्याचा धक्कादायक पुण्यातील नानापेठ परिसरात घडला. याप्रकरणी नात्याला काळीमा फासणार्‍या पतीवर आता समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय पत्नीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आरोपी हे पती पत्नी ओत. त्यांचा एप्रिल 2015 मध्ये विवाह झाला आहे. 2015 ते आजपर्यंतच्या कालावधीत पतीने पत्नीचा कौटुंबिक छळ करून तिला पॉर्न व्हिडीओ दाखविले. त्या पॉर्न व्हिडीओ प्रमाणे त्याने पत्नीबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच तिला विवस्त्र असवस्थेत नाचण्यास लावुन त्याचे चित्रीकरण केले. तसेच तो करत असलेल्या कृत्यास विरोध केल्यास ती चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेवुन तिचे स्त्रीधन काढुन घेतले. तसेच तिला घराबाहेर काढले. ती माहेरी गेल्यावर तिला रात्री अपरात्री फोन करून शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली. डिसेंबर 2015 मध्ये फिर्यादीची बहिणी अपर्णा काम करीत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे अशा आशयाचे पत्र पाठवुन तिची बदनामी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले.