December 14, 2024

पुणे: येरवडा भागात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे, १०/०७/२०२३: येरवडा भागातील काॅमर झोन संकुलाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

परेश सुनील गलियाल (वय २६, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वार परेश रविवारी रात्री काॅमर झोन संकुल परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार परेशला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या परेशचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.