July 25, 2024

पुणे: मुंढव्यात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

पुणे, दि. २३/०६/२०२३: भरधाव टँकरचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात २१ जूनला दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंढव्यातील एबीसी रस्त्यावर घडला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णकुमार एस (वय ३९ रा. केसनंद, वाघोली ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. त्याचा मित्र अमेय पंतवैदय (वय ३९ रा. बावधन) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कृष्णकुमार एका खासगी कंपनीत कामाला होता. २१ जूनला दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी मुंढव्यातील एबीसी चौक परिसरात भरधाव टँकरचालकाने त्यांना धडक दिली.

त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या कृष्णकुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे तपास करीत आहेत.