पुणे, 23 जून 2023 – वडिलांसह सावत्र आईकडून दिल्या जाणार्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीने धावत्या रेल्वेतून झोकून देत आत्महत्या केली. ही घटना ३ जूनला घडली आहे. याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
अश्विनी चव्हाण (वय १७, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिल नामदेव चव्हाण, सावत्रआई लक्ष्मी चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटूंबिय अनेक वर्षांपासून येरवडा परिसरात राहायला आहे. नामदेवला पहिल्या पत्नीपासून मुलगी झाली होती. मात्र, त्याने लक्ष्मीसोबत लग्न केले होते. २०१४ पासून दोघेही अश्विनीला शारिरीक व मानसिक त्रास देत होते. दरम्यान, ३ जूनला तिघेही रेल्वेतून प्रवास करीत होते. त्रासाला कंटाळून अश्विनीने दौंडच्या हद्दीत रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन