पुणे, ११/०४/२०२३: बांधकाम चालू ठेवण्यासाठी रोख 30 लाखांची मागणी करून टु बीएचकेची /मागणी करत आम्ही कोणाला ही घाबरत नसल्याचे म्हणत खंडणीची मागणी करणार्या तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर पठाण, शफी पठाण आणि साजिद (सर्व रा. परगेनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुस्तफा इमामसहाब शेख (30, रा. गल्ली नंबर 9, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2022 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान घडला.
फिर्यादी हे कोंढवा खुर्द येथील पोकळे मळा येथील एका ठिकाणी 7 गुंठ्यांपैकी 4 गुंठ्यांवर जॉईंट व्हेंचरमध्ये बांधकाम करीत असताना आरोपी यांनी शेख यांना बांधकाम चालु ठेवण्यासाठी 30 लाख रोख मागितले. तडजोडीअंती रोख स्वरूपात 15 लाख शफी पठाण याला तर एक टु बीएचके एका मस्जिदच्या नावे तसेच समीर पठाण याला दहा लाख रूपये रोख अशी मागणी केली. फिर्यादी शेख यांनी त्यांच्या मागणीला विरोध केल्याने त्यांनी शेख यांचे बांधकाम बंद करून आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही येथील स्थानिक असून येथे फक्त आमचेच चालते अशी धमकी देवुन पैशाची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी