पुणे, 12 एप्रिल 2023 : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट पाहतात. रमजान महिन्यात दरवर्षी अस्सल खवय्यांची पावले आपोआप कॅम्पमधील बॉम्बे गॅरेज चौकातील शालिमार केटरर्सकडे वळतात. यंदाही शालिमाच्या स्टॉलवरील विशेष मांसाहारी व गोड पदार्थांना खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे.
येथील अफगानी लेग, दालचा खाना, कबाब, लखनवी पुलाव, शाही तुकडा, चिकन-मटण बिर्याणी अशा २५ ते ३० पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. यातही दालचा खाना आणि गोड पदार्थात शाही तुकडा न खाता खवय्ये माघारी परत येणे अशक्यच आहे.
ईदच्या दिवशी या स्टॉलवर शिरकुर्मा स्पेशल असतो. केटरर्सचे मालक नुसरत भाई यांच्या विशेष मेहमाननवाजीमुळे ग्राहक स्टॉल शोधत येतात व मोठ्या चवीने येथील पदार्थ चाखतात. प्रत्येक ग्राहकांची आपुलकीने चौकशी करणे, ‘आधी चव बघा आणि मग खा’ या नुसरत भाईंच्या आपुलकीच्या आग्रहामुळे ग्राहकांना ते आपलेसे करतात. त्या ग्राहकांची स्टॉलसोबत कायमची नाळ जोडली जाते. त्यामुळेच गेल्या पंधरा वर्षांपासून येणारे ग्राहक येथे आढळतात.
नुसरत भाई यांची मुलगी अर्शिन नुसरत शेख ही देखील हॉटेल व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी घेऊन वडिलांच्या हॉटेल व्यवसायात नवनवीन इनोवेशन करीत नव्या पिढीला आवडणारे खाद्य पदार्थ हॉटेलमध्ये आसण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
मुस्लिम बांधव दिवसभराचा कडक उपवास धरल्यानंतर रात्री ७.३० नंतर रोजा सोडण्यासाठी रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी शालिमार केटरर्सला भेट देतात. खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेऊन मुस्लिम बांधव रोजा सोडतात. याशिवाय सर्वधर्मीय खवय्ये याठिकाणी मोठी गर्दी करतात. हा स्टॉल दुपारी ४ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू असतो.
शालिमार केटरर्सचे प्रमुख नुसरत भाई म्हणाले, “केटरर्सचा व्यवसाय असलेल्या मित्राच्या सहकार्यामुळे १५ वर्षांपूर्वी या व्यवसायात उतरलो. आपुलकी, सर्वधर्म समभाव, सर्वांशी मैत्री आणि जिव्हाळा आदी गुणांमुळे लवकरच व्यवसायात जम बसला. मेहमाननवाजी हेच यशस्वी होण्याचे रहस्य आहे. चांगले काम करताना अडचणी खूप येतात पण मी थांबत नाही. त्यात सर्व धर्मियांची मोठी साथ मिळाली.”
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.