पुणे, १८/०६/२०२३: सोसायटीच्या आवारात वाहन लावण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून एका तरुणाने डाॅक्टर महिलेच्या घरात शिरुन तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घडली. तरुणाने डाॅक्टर महिलेला शिवीगाळ करुन तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर भागातील ससाणेनगर येथील साई निवास सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी तरुणासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर महिला आणि आरोपी एकाच सोसायटीत राहायला आहेत. आरोपी तरुणाने डाॅक्टर महिलेची गाडी पार्किंगमधून काढली होती.
त्यानंतर तक्रारदार महिला विचारणा करण्यासाठी तरुणाच्या आईकडे गेली होती. त्यावेळी आरोपी तरुणाने आणि त्याच्या आईने तक्रारदार तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी तरुणाने तक्रारदार महिलेच्या घरात घुसून धारदार शस्त्राने वार केले. तिला शिवीगाळ करुन तरुणाने अश्लील वर्तन केले. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.
—
उपाहारगृहातील आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
मालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार