November 11, 2024

पुणे: पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीच्या विरुद्ध गुन्हा, ५० लाखांचा मागणीसाठी विवाहितेचा छळ

पुणे, २४/०३/२०२३: पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करुन छळ केल्या प्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पती अबजूर सलीम शेख, नणंद बुशारा, सासू शेरबानो, हुमा, सासरे समीर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विवाहित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अबजूर याचा दोन वर्षांपूर्वी तरुणीशी विवाह झाला होता. अबजूरने व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी तरुणीकडे केली होती. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरु केला. त्याने पत्नीशी अनैसर्गिक कृत्य केले. पत्नीशी भांडण करुन अबजूर तीन वेळा तलाक असे म्हणाला. तरुणी गर्भवती असताना तिला वडिलांच्या घरी पाठवून दिले. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.