पुणे, दि. १५ जून २०२२: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना कुमशेत येथे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभागातील जुन्नर उपविभाग अंतर्गत सहायक अभियंता कृष्णा कोळी व रोहिणी आंबेकर तसेच जनमित्र सुखानंद डोणे, अजरुद्दीन शेख, कुंडलिक तळपे व योगेश अंबलकार यांच्याकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान कुमशेत येथील वीजग्राहक बाळासाहेब बबन डोके याच्याकडे वीजबिलापोटी ५ हजार ५९० रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत होती. मात्र ‘तुम्ही इथे आलेच कसे’ असे म्हणत आरोपी बाळासाहेब बबन डोके व सुधीर बाळासाहेब डोके यांनी मोठ्या आवाजात शिविगाळ सुरु केली. सहायक अभियंता कृष्णा कोळी व जनमित्रांना धक्काबुक्की, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला.
या प्रकरणी महावितरणकडून जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जुन्नर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.