June 14, 2024

पुणे: कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार चिमुरडा ठार, कोलवडी ते थेउर फाटा परिसरातील घटना

पुणे, दि. ३/०८/२०२३: भरधाव कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ११ वर्षीय चिमुरडा ठार झाला आहे. हा अपघात १ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास कोलवडी ते थेउर फाटा रस्त्यावर घडला आहे. याप्रकरणी कंटेरनर चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

रामा पवार (वय ११, रा. अलीफनगर, थेउर ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालक सुनीलकुमार तेजबहाद्दुर यादव (वय ३८, रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. विठ्ठल पवार (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा हा १ ऑगस्टला कोलवडी ते थेउर रस्ता परिसरात सायकल चालवित होता. रस्ता ओलांडत असताना कोलवडीहून थेउर फाट्याकडे जाणार्‍या भरधाव कंटेनर चालक सुनीलकुमारने रामाला जबरी ठोस दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करीत आहेत.