पुणे, दि. ०३/०८/२०२३: दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याच्याकडील दुचाकी, कागदपत्रे असलेली पिशवी असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ही घटना १ ऑगस्टला रात्री साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील सादल बाबा चौकात घडली आहे. याप्रकरणी अनिल पवार वय ३६, रा. इंद्रिरानगर, बिबवेवाडी याने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल एका खासगी कंपनीत कामाला असून १ ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवरुन घरी चालले होते. त्यावेळी सादलबाबा चौकात दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्याला अडवून दमदाटी केली. त्याच्याकडील कागदपत्रे असलेली पिशवी आणि दुचाकी असा १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी