पुणे, 17 एप्रिल, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा 11 व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून 19 वर्षाखालील गटात 50 खेळाडूंनी आणि 11 वर्षाखालील गटात 100 खेळाडूंनी अशा एकूण 150 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये हि स्पर्धा गणेश सभागृह आणि अश्वमेध हॉल, कर्वे रोड येथे 19 ते 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी मानांकित खेळाडूंमध्ये 11 वर्षाखालील मुलांच्या गटात अविरत चौहान(1411), श्लोक माळी(1299), ओम रामगुडे(1275) तर, मुलींच्या गटात चतुर्थी परदेशी(1219), मिहिका बोले(1077)यांचा समावेश आहे.
तसेच, 19 वर्षाखालील खुल्या गटात विरेश शरणार्थी(1685), ओम लामकाने(1666), श्लोक शरणार्थी(1569) तर, मुलींच्या गटात श्रावणी उंडाळे(1402), प्रकृती खंडेलवाल (1131) यांचा समावेश आहे. तसेच, या स्पर्धेतील 11 वर्षाखालील मुलांच्या गटातील सात खेळाडूंची आणि मुलींच्या गटातील सहा खेळाडूंची, तर 19 वर्षाखालील खुल्या गटातील सात आणि मुलींच्या गटात चार खेळाडूंची निवड आगामी महाराष्ट्र राज्य 11 व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार असून हे खेळाडू या स्पर्धेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व व्यस्थापकीय संचालक महेश कुंटे, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष व ट्रुस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते बुधवारी, 19एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.15वाजता करण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सुरू होणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा