October 14, 2025

पुणे: सिंहगड रस्त्यावर हाहकार एकता नगरी पाण्यात बुडाली

पुणे, २५ जुलै २०२४ : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून पस्तीस हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. यामुळे सिंहगड रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली एकता नगरी द्वारका नगरी यासह सुमारे या परिसरातील 50 ते 60 सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. अनेकांचे संसार वाहून गेली असून कोट्यावधी स्वरूपाचे नुकसान यामध्ये झालेले आहे. धरणातील पाणी कमी केल्यानंतर या ठिकाणचे पाणी ओसरले असून मदत कार्यास वेग आला आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे. याचा फटका पुणे शहरातील सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट या भागात बसल्याचे सध्या समोर आलेले आहेत खडकवासला धरणातून पहाटे 24000 क्युसिक पाणी सोडण्यात आले, त्यानंतर सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. पाण्याची पातळी वाढल्यानंतर सोसायटीमध्ये पाणी घुसण्यास पहाटे चार पासून सुरुवात झाली महापालिकेने नागरिकांना भोंग्या द्वारे घरातून बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कसाबसा जीव वाचवत घरातून पाय बाहेर काढला काही जणांनी सोसायटीमध्ये वरच्या मजल्यावर राहण्याची सोय करून घेतली.तर काहीजण त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी. गेले सकाळी साडेसातच्या सुमारास मात्र आनंद नगर मधील अनेक सोसायटी यांच्या परिसरात पाणी घुसले. पार्किंग मधील दुचाकी चारचाकी पूर्णपणे पाण्यात बुडाल्या. नागरिकांच्या घरातील फ्रिज, सोफा, घरगुती साहित्य, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे साहित्य सर्वकाही पाण्यात वाहून गेले या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली पुण्यात भयंकर स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील निदर्शनास आणून देण्यात आले त्यानंतर खडकवासला धरणातील विसर्ग 35000 वरून पंधरा हजार इतका कमी करण्यात आला त्यामुळे पाणी कमी झालेले आहे.

सकाळी दहा नंतर पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली त्यामध्ये नागरिकांच्या घरात दुकानांमध्ये प्रचंड होता त्यामुळे अनेकांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

व्यावसायिकांचे मोठे नुकसान
एकता नगरच्या जवळपास अनेक व्यवसायिकांचे दुकाने आहेत यामध्ये वैद्यकीय उपकरणे किराणा दुकान टेलर गॅरेज ब्युटी पार्लर या अन्य दुकानांचा समावेश आहे. पावसाचे पाणी अचानक दुकानांमध्ये घुसल्याने त्यांना सामान हलवण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे.