पुणे, २५/०६/२०२३: कामावरुन घरी निघालेल्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी तीन मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात घडली.
याबाबत खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका खासगी कंपनीत कामाला आहे. मध्यरात्री कर्मचारी आणि दोन सहकारी कंपनीतून घरी निघाले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावर बजाज शोरुमजवळ ते बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खासगी कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्याकडील तीन मोबाइल संच, दोन हजारांची रोकड असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही