October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार, एक जखमी

पुणे, दि. २५/०६/२०२३ – भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा पती गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात २३ जूनला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोरतावाडीनजीक वाकडा पूल परिसरात घडला.

 

छाया सुहास जाधव (वय ३४ ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सुहास शरद जाधव (वय ४०) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रेणूका साळुंखे (वय ३२, रा. माळवाडी, सोरतापवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणूका तिची बहीण छाया आणि दाजी सुहास हे २३ जूनला दुचाकीवरुन सोरतापवाडी परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या छायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे पती सुहास हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.