पुणे, ५ जून २०२५ : शहरातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर (एफसी रोड) वाढलेल्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी जोरदार कारवाई केली. प्लॉट क्रमांक ६१४ बी येथील अनधिकृत दुकानांवर कारवाई करत पालिका अधिकाऱ्यांनी थेट बुलडोझर चालवून अतिक्रमण हटवले. या मोहिमेत एकूण १२,५०० चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
पुणे शहरातील विविध भागांतील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने अलीकडेच मोहीम उघडली असून, गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. एफसी रोडवर अनेक अनधिकृत दुकाने व बांधकामे उभारण्यात आली होती. याआधी देखील गेल्या महिन्यात दोन ते तीन वेळा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा एकदा शहर अभियंता व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विकास विभाग झोन ६ तर्फे ही कारवाई राबवण्यात आली.
या कारवाईत कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपेम, उपअभियंता रणजीत मुटकुळे, किरण कलशेट्टी तसेच कनिष्ठ अभियंते महेश शिंदे, मनोजकुमार मते आणि सागर शिंदे यांनी सहभाग घेतला.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा