पुणे, दि. ६/०७/२०२३: भांडणाचा राग मनामध्ये धरुन टोळक्याने तरुणाला मारहाण करीत शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले. ही घटना ५ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास विश्रांतवाडीतील लोहगाव चौकात घडली.
अभिषेक उर्फ अभी रमेश तांबे (वय २१, धानोरी) सुमीत नागेश लंगडे (वय २५ रा लोहगाव रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहिल शेख (वय १८, रा. धानोरी) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हे ५ जुलैला रस्त्याने घरी चालले होते. त्यावेळी त्यांच्या आत्याच्या मुलाच्या भांडणाचा राग मनामध्ये धरुन टोळक्याने साहिलला थांबवून मारहाण केली. त्यांना जीवे मारण्यासाठी शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले.याप्रकरणी पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ