December 2, 2023

पुणे: डांबर असलेल्या ड्रममधे अडकलेल्या दोन श्वानांची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे, ३०/०७/२०२३: डांबर असले्लया ड्रममध्ये अडकलेल्या दाेन श्वानांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. काेंढवा भागातील एका साेसायटीच्या आवारात ही घटना घडली.

काेंढवा भागातील पारगेनगर परिसरात डीएसके साेसायटी ओहे. साेसायटीच्या मागील बाजूस डांबर ठेवलेल्या ड्रममध्ये दाेन श्वान अडकले. याबाबतची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दिली. त्यानंतर जवान घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर जवानांनी वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्राेटेक्शन साेसायटीचे अध्यक्ष आनंद अडसुळ यांच्याशी संपर्क साधला. या संस्थेचे दोन सदस्य तेथे पोहोचले होते. जवानांनी शक्कल लढवली जवानांनी सर्क्युलर सॉ अग्निशमन उपकरण वापरुन ड्रमचे दोन भाग केले. त्यानंतर अग्निशमन वाहनातील बचाव साहित्यांचा उपयोग करुन तसेच तेलाचा वापर करुन तासाभरात दाेन श्वानांची सुखरुप सुटका केली.

कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील तांडेल निलेश लोणकर, वाहनचालक दिपक कचरे तसेच जवान रवि बारटक्के, सागर इंगळे, अनिकेत गोगावले, मनोज गायकवाड, संतोष माने आणि वाईल्ड एनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य लक्ष्मण वाघमारे, संदेश रसाळ यांनी ही कामगिरी केली स्थानिक रहिवाशी प्रतिभा पवार यांनी अग्निशमन दलाकडे वेळीच माहिती दिल्याने अग्निशमन दल, प्राणी मित्र संस्थेने श्वानाची सुटका वेळेवर केल्याने दाेन श्वान बचावले.