July 24, 2024

पुणे: धायरीत टोळक्याकडून चौघांना बेदम मारहाण

पुणे, दि. ०५/०३/२०२३: मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या मित्रांना टोळक्याने विनाकारण बेदम  मारहाण केल्याची घटना ३ मार्चला संध्याकाळी साडे नऊच्या सुमारास धायरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी

भुषण मोहीते  वय-२०, रा.धायरी याने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण हे त्याच्या ओमसाई ऑर्चीड बिल्डींग महादेवनगर, घरातुन जेवण करुन गणपती मंदीरा जवळ कट्टयाचे समोर त्यांचे मित्रांबरोबर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी  काहीएक कारण नसताना भूषण च्या  मित्रांशी वाद घालुन, मित्र अभिषेक हजारे, समर्थ माने, कुणाल गायकवाड व अंकुश लोखंडे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना  कुहाडीचा धाक दाखवुन “चुपचाप घरी निघुन जायचे, इथे परत दिसायचे नाही” असे म्हणुन त्यांना शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.