February 12, 2025

पुणे: टोळक्याकडून केशकर्तनालयाची तोडफोड

पुणे, ०४/०६/२०२३: केशकर्तनालयाच्या मालकाला मारहाण करुन टोळक्याने केशकर्तनालयात तोडफोड केल्याची घटना लोणी काळभाेर भागात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निखिल उर्फ सोन्या घायाळ, शकील शेख, मयूर पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत आदित्य प्रकाश भोसले (वय २०, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर परिसरात आदित्य भोसले याचे केशकर्तनालय आहे. आरोपी घायाळ, शेख, पवार आणि साथीदार केशकर्तनालयात आले. त्या वेळी आदित्य आणि कारागिर समीर इद्रीस काम करत होते. आरोपींनी आदित्यशी वाद घालून केशकर्तनालयात तोडफोड केली. आदित्यला गजाने मारहाण केली. दहशत माजवून आरोपी मोटारीतून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.