June 24, 2024

पुणे: येरवड्यात भरदिवसा घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, दि. २३/०६/२०२३: भरदिवसा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना २२ जूनला दुपारी दीडच्या सुमारास येरवड्यातील सुमा बिल्डींगमध्ये घडली. याप्रकरणी नरेश चौधरी (वय ३५, रा. चित्रा चौक, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश हे कुटूंबियासह येरवड्यातील सुमा इमारतीत राहायला आहेत. २२ जूनला दुपारी त्यांचा फ्लॅट बंद असताना, चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील साडेतीन लाखांचे दागिने मोबाइल असा ३ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करीत आहेत.