पुणे, दि.२४/०२/२०२३: गुन्हेगारी टोळ्यांमधील सराइतांचा वाद झाल्याने सराइतांनी एकमेकांवर कोयते उगारुन दहशत माजविली. ही घटना ससून रुग्णालयाच्या आवारात घडली असून घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात असलेल्या नागरिकांमध्ये घबराट उडाली.
हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराइतांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील सराइत हडपसर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी कारवाई करून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेले. त्यावेळी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी त्यांच्या बरोबर होते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) दोन टोळ्यांमधील सराइत समोरासमोर आले. सराइतांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करुन कोयते उगारुन दहशत माजविली.
ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराइतांना रोखण्याचा प्रयत्न केला. हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणात दोन टोळ्यांमधील सराइतांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयात येरवडा कारागृहातून उपचारासाठी दाखल झालेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंबीर याच्यावर हल्ला झाला होता.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा