May 16, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब संघाचा विजय

पुणे, 25 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 48 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. 
 
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात समर्थ भोरेच्या दमदार आष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पूना क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 48 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पूना क्लब संघाने 50 षटकांत 9 बाद 205 धावा केल्या. यात समर्थ भोरेने 97 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक करत संघाचा डाव भक्कम केला. आदित्य पात्राने 26 व आदित्य हराळेने 22 धावा करून समर्थला सुरेख साथ दिली. 205 धावांच्या आव्हानाचा सामना करताना हर्षवर्धन येसुगडे , प्रणव शिंदे व समर्थ भोरे यांच्या अचूक गोलंदाजीने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 43 षटकांत सर्वबाद 157 धावांत रोखत संघाला विजय मिळवून दिला. 58 धावा व एक गडी बाद करणारा समर्थ भोरे सामनावीर ठरला. 
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

पूना क्लब: 50 षटकांत 9 बाद 205 धावा(समर्थ भोरे 58(97,9×4), आदित्य पात्रा 26(65,3×4), आदित्य हराळे 22(41,2×4), आदित डोंगरे 3-21, क्षरीन ठाकूर 3-42, वीर कारखानीस 1-35) वि.वि पीवायसी हिंदू जिमखाना: 43 षटकांत सर्वबाद 157 धावा(श्लोक जोशी 38(48,5×4), अर्जुन चेपे 35(55,5×4), आदित्य गौड 27(57,3×4), हर्षवर्धन येसुगडे 3-13 , प्रणव शिंदे 3-40, समर्थ भोरे 1-27) सामनावीर- समर्थ भोरे
पूना क्लब संघ 48 धावांनी विजयी