December 14, 2024
Pune: IPL match betting in Kondhwa ruined; Three people were arrested, a case was also registered against a famous pub owner

पुणे: कोंढव्यात आयपीएल सामन्यावरील बेटींगचा डाव उध्वस्त; तिघांना अटक, प्रसिद्ध पबमालकाविरुद्धही गुन्हा

पुणे, दि. २१/०५/२०२३: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपीटल आणि चैन्नई सुपरकिंग सामन्यावेळी सुरु असलेल्या बेटींगचा डाव पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उध्वस्त केले आहे. कोंढवा परिसरात धनश्री सिग्नेचर सोसायटीतील फ्लॅटमध्ये छापा टाकून खंडणी विरोधी पथकाने तिघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ मोबाइल, लॅपटॉप, असे साहित्य जप्त केले आहे. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

वसीम हनीफ शेख (वय ३९, रा . कोंढवा), इक्रमा मकसुद मुल्ला (वय २६ रा . घोरपडी पेठ), मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा सोमवार पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मध्यप्रदेश इंदोरमधील बुकी अक्षय तिवारी आणि कोरेगाव पार्कमधील प्लंज पबमालक जीतेश मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

कोंढव्यातील सिग्नेचर सोसायटीत दिल्ली कॅपीटल आणि चैन्नई सुपरकिंग सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक दोनचे अमलदार सुधीर इंगळे आणि शंकर संपते यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त अमोल झेंंडे, एसीपी सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने सिग्नेचर सोसायटीतील फ्लॅटमध्ये छापा टाकला. त्यावेळी तिघेजण बेटींग घेताना आढळून आले. त्यांच्याकडून ५ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सुधीर इंगळे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे यांनी केली.